FD Interest Rate: प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असते. त्यामुळे नागरिक चांगल्या परताव्यासाठी गुंतवणुकीच्या सर्वोत्तम साधनांच्या शोधात असतात. मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. प्रत्येक बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वेगवेगळे असतात. त्याचवेळी, 2022-23 या आर्थिक वर्षात अनेक खाजगी बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 6 बँकांची माहिती देणार आहोत ज्या मुदत ठेवींवर 9% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत.
FD Interest Rate
देशातील अनेक मोठ्या बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. FD व्याजदरात सतत वाढ झाल्यानंतरही, मोठ्या PSU आणि काही खाजगी बँका अजूनही त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना FD वर 9% व्याजदर देण्यापासून दूर आहेत. सध्या, काही बँका त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना FD वर 9% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. या बँकांमध्ये एफडी करून ज्येष्ठ नागरिक अधिक व्याजदरासह चांगले परतावा मिळवू शकतात. कोणती खाजगी बँक FD वर चांगला परतावा देत आहे ते जाणून घेऊया.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (SFB) सामान्य नागरिकांसाठी FD वर 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर 9.50% व्याजदर देते. बँक 1001 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 9.50 टक्के व्याजदर देते. बँक 181-201 दिवस आणि 501 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के व्याज देते.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींचे दर 9.01 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. बँक 1000 दिवसांच्या कालावधीत 3 टक्के ते 8.41 टक्के सामान्य लोकांना आणि 3.60 टक्के ते 9.01 टक्के ज्येष्ठ नागरिकांना FD व्याज दर देते.
जन स्मॉल फायनान्स बँक
जना स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.२५% ते ९% दरम्यान व्याजदर देते आणि ३६६-४९९ दिवस, ५०१ दिवस – २ वर्षे आणि ५०० दिवसांच्या कालावधीसाठी ९% चा सर्वोत्तम व्याजदर दिला जातो.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 05 मे 2023 पासून मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन व्याजदर लागू केले आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदर 9.60% पर्यंत वाढवले आहेत. बँक 5 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 4.50% ते 9.60% पर्यंत FD व्याज दर देते. बँक 999 दिवसांच्या कालावधीसाठी 9.50% आणि 1 वर्ष ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 9% व्याज दर ऑफर करते.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 9% ऑफर करते तर सामान्य लोकांसाठी व्याजदर 888 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींसाठी 8.5 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. नवीन व्याजदर 11 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत.
ESAF स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 9% आणि सामान्य नागरिकांसाठी 8.50% व्याजदर देते.